विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स



              विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स

प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम मार्कांनी पास व्हायची ईच्छा असते, त्याप्रमाणे ते खूप अभ्यासही करतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊनही विषय आठवत नाही. (स्मरणात राहत नाही). विषय आठवत नसल्याने, उत्तर लिहिता येत नाही. त्यामुळे कमी मार्क मिळतात किंवा नापास होण्याची नामुष्की येते.

विषय स्मरणात न राहण्याची मुख्य कारणे:
१. वर्गात शिकताना मनापासून लक्ष न देणे
२. एकाग्रता नसणे
३. अभ्यासात रुची (Interest) नसणे
४. खुप विचार करणे

प्रथमतः आपण स्मरणशक्ती म्हणजे काय हे जाणून घेऊया:

आपण आपल्या रोजच्या जीवनात जे पाहतो, ऐकतो इतर विविध गोष्टी आपण करतो, त्या सर्व गोष्टी आपला मेंदू साठवुन ठेवत असतो. मेंदूने साठवुन ठेवलेल्या सर्व गोष्टी आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.

विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप अभ्यास करून सुदधा विषय आठवत (स्मरणात) राहत नसेल, चिंता करायची गरज नाही.

या लेखात दिलेल्या 
  महत्त्वाच्या टिप्स तुम्ही अभ्यास करताना वापरल्यास तुमची स्मरणशक्ती नक्की वाढेल.
टिप १. 

वर्गात शिकताना नीट लक्ष दया 


जेव्हा वर्ग शिक्षक शिकवत असतात त्यावेळी नीट लक्ष देऊन ऐका. त्याचबरोबर तुमच्या वहीमध्ये नोंद करा. 
 एखादा point समजला नसेल तर लगेच विचारा व point तिथल्या तिथेच clear करून घ्या. 
घरी आल्यावर प्रत्येक विषयांची revision करा.


टीप २.
एकाग्रता ठेवा



अभ्यास करताना मन एकाग्र ठेवा. मन विचलित होऊ देऊ नका. मन विचलित करणाऱ्या गोष्टी जवळ ठेवु नका.
 अभ्यास करताना दर तासांनी ब्रेक घ्या. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
याचबरोबर ध्यानधारणा करा त्यामुळे मनाची एकाग्रता वाढेल. जेव्हा तुम्ही एकाग्रतेने अभ्यास कराल तो नेहमी स्मरणात राहील.



टीप ३.
ध्येय निश्चित करा


लहानपणी तुमच्या पालकांनी, नातेवाईकांनी, मित्र मैत्रिणींनी शिक्षकांनी तुम्हाला एक प्रश्न निश्चितच विचारला असेल तो म्हणजे तुला मोठे होऊन काय बनायचे आहे. तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी मला-Doctor, Engineer, Advocate, CA असे सांगितले असेल. विद्यार्थी मित्रांनो हीच तुमची आवड, हेच तुमचे ध्येय.

जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय पुर्ण करण्याच्या हेतूने अभ्यास कराल तेव्हा तो तुम्ही आवडीने कराल. आवडीने केलेला अभ्यास नेहमी स्मरणात राहतो. 


टीप ४.
खुप विचार करू नका
आपले मन हे खुप चंचल असते, त्यात एकाच वेळी अनेक विचार येतात. इतर विचार मनात आल्याने मन विचलित होते, अशावेळेस इतर विचारांना मनात थारा देऊ नका. अभ्यास करतांना तुमचे लक्ष पूर्णतः अभ्यासवर केंद्रित करा.

टीप ५.
RWR फॉर्म्युला
मी तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला देत आहे जो मी माझे फार्मसीचे शिक्षण करत असताना वापरला होता. 
तो फॉर्म्युला आहे RWR (Read, Write, Repeat) वाचा, लिहा आणि जे वाचले आणि लिहिले आहे ते Repeat करा. असे केल्याने तुम्हाला विषय कायमचा स्मरणात राहील.


टीप ६.
अभ्यास करताना मनात Visuals create करा


तुम्ही जेव्हा movie बघायला जाता, तो नेहमी लक्षात राहतो याचे मुख्य कारण आहे Visuals. 
Visuals मुळे आपल्याला गोष्टी लवकर आणि कायमच्या स्मरणात राहतात. अभ्यास करताना त्याचे चित्र मनात create करा  यामुळे विषय लवकर समजुन स्मरणात राहील.


टीप ७.
पोषक आहार घ्या 


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, फळे, बदाम तसेच मुबलक प्रमाणात omega 3 fatty acids असणारे पदार्थ जसे अक्रोड, मासे,सोयाबीन यांचे दररोज सेवन करा.

या लेखात दिलेल्या ५ महत्वाच्या टिप्सचा तुम्ही वापर केल्यास तुमची स्मरणशक्ती नक्की वाढेल.
वरील लेख तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.

विद्यार्थी सबलीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा माझा संकल्प आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवुन त्यांना यशाची उत्तुंग भरारी घेण्यास सहकार्य करणे होय.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही उत्तुंग भरारी या समूहात सामील व्हा.

उत्तुंग भरारी या समूहात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.facebook.com/groups/nitinbpatil

तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा.

किंवा
9930610710 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.

positivenitin1@gmail.com
sanrosatinp@gmail.com

या इ मेल ID वर मेल करा.

अनेक शुभेच्छा
नितीन पाटील
उत्तुंग भरारी
संस्थापक
विद्यार्थी करियर यशसारथी
Positive Energy Influencer
Student Empowerment Enthusiast


मित्र मैत्रिणींना 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र