ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम


            ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम

तुमच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असणे फार जरुरी आहे.  तुमच्या आयुष्यात ध्येय  निश्चित नसल्यास काय होते, याकरिता मी माझे स्वतःचे उदाहरण तुम्हाला सांगत आहे.

मी जेव्हा १० वी पास झालो तेव्हा मला कोणते क्षेत्र निवडायचे याची बिलकुल कल्पना नव्हतीमाझ्या मित्रांनी सांगितले की वाणिज्य (Commerce) क्षेत्रात  तू admission घे कारण ते Science पेक्षा सोपे आहे.   

म्हणून मी Commerce ला admission घेतले. मुंबईतल्या एका प्रसिद्ध कॉलेज मध्ये मी एक महिना कॉलेज attend केले आणि अचानक माझ्या मामांनी आणि घरच्यांनी commerce सोडून
Diploma in Civil Engineering ला admission घेण्यास सांगितले

Diploma in Civil Engineering ला admission तर घेतले  मला तो अभ्यास काही झेपेना त्याचा परिणाम म्हणजे मी सर्व विषयात वर्ष नापास झालो. यामुळे माझ्या जीवनातील दोन मौल्यवान वर्ष वाया गेली.

याचे मुख्य कारण म्हणजे मला माझे ध्येयच माहीत नव्हते. तुमच्या बाबतीत असे घडू नये म्हणून जीवनात ध्येय असणे फार जरुरी आहे.  

अजून काही उदाहरणा द्वारे ध्येयाचे (गोल) किती महत्व आहे हे तुम्हाला कळेलसमजा बास्केट बॉल, फुटबॉल खेळाडूंना मैदानात किंवा कोर्ट वर गोल करायला गोल पोस्टच ठेवली नाही तर त्यांना गोल करायला काही ध्येयच राहणार नाही ते फक्त बॉल इकडून तिकडे टोलवतील. 

 त्याच प्रमाणे जर क्रिकेट मध्ये मैदानात stump ठेवले नाही तर बॉलर, फिल्डर, विकेट किपर, गोलच/ध्येय नसल्याने खेळाडूला आउट कसे करणारआणि सर्व खेळच निरस होईल. त्याकरिता ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम हा लेख तुम्हा सर्वांसाठी.


ध्येय निश्चितीचा पहिला नियम : ध्येय निश्चित करा                                                 

तुमच्या आयुष्यात तुमच्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार तुमचे ध्येय निश्चित असायला हवेएकदा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केल्यावर, त्या ध्येयाची ध्येयपूर्ती झाल्यावर काय फायदे होतील हे बघा. ध्येय  निश्चित केल्याने तुमच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळेल. आयुष्यात एक नवीन उत्साह निर्माण होईल आणि तुम्ही जोमाने  ध्येयपूर्तीसाठी काम कराल. आवडीचे ध्येय ठरवून त्यानुसार कठोर मेहनतीने आणि चिकाटीने आपली ध्येयपूर्ती केल्याचे योग्य उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर.  तुम्ही सुद्धा जर ध्येय निश्चित केल्यास यशाची उत्तुंग भरारी निश्चित घ्याल यात मला तिळमात्र हि शंका नाही.

 ध्येय निश्चितीचा दुसरा  नियम: ध्येय लिहून ठेवा                                                          


तुमचे ध्येय हे एका वहीमध्ये, पॉकेट डायरी मध्ये  लिहा तसेच घरात दररोज येता जाता दिसेल अश्या जागेवर
चिटकवा, म्हणजे तुम्हाला तुमचे ध्येय नेहमी दिसत राहील आणि न चुकता तुम्ही दररोज तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करत राहाल. हि लिहिलेली ध्येय तुम्हला जागरूक ठेवून ध्येयपूर्तीकरिता प्रोत्साहन देतील. 

ध्येय निश्चितीचा तिसरा नियम:   ध्येयपूर्ती साठी योग्य नियोजन करा                                                            

ध्येयपूर्तीकरिता योग्य नियोजन करा. ध्येयपूर्तीकरिता लागणारे उचित ज्ञान घ्या आणि कौशल्यआत्मसात  करा. तसेच त्यामध्ये येणारे अडथळे जाणून त्यावर काम करा. याकरिता तुम्ही योग्य लोकांकडून मार्गदर्शन घ्या. ध्येय पूर्तीसाठी नियोजन करताना कोणते काम सर्वात महत्वाचे आहे हे निश्चित करा, त्यानुसार कामास सुरवात करा.  योग्य नियोजन आणि योग्य लोकांकडून मार्गदर्शन घेतल्यास तुमच्या हातून चुका होण्याचे टळेल व लवकर ध्येयपूर्ती होईल.


ध्येय निश्चितीचा चौथा नियम: ध्येयपूर्ती करिता परिणामकारक कृती करा                            

आजकालच्या या डिजिटल युगामध्ये फक्त ज्ञान असून पुरेसे नाही त्याकरिता असलेल्या ज्ञानावर कृती करणे फार जरुरी आहे. कृती केल्यानेच तुमची ध्येयपूर्ती होणार आहे. कृती करताना तुमचे लक्ष्य विचलित होऊ न देता कृती करा, दररोज ध्येयपूर्तीसाठी कार्य करत राहा, म्हणजे यश हे निश्चित समजा.

ध्येय निश्चितीचा पाचवा नियम: ध्येयपूर्ती करिता  अंतिम मुदत ठरवा 

एकदा का तुम्ही ध्येय निश्चित केले कि सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या ध्येयपूर्तीची अंतिम तारीख, दिवस, मुदत निश्चित करा. तसे केल्याने तुम्ही तुमच्या  ध्येयपूर्तीच्या दिशेने कार्यरत रहाल. अंतिम मुदत निश्चित केल्याने तुम्ही चालढकल करणार नाही. 

ध्येय निश्चित करून वरील ५ नियमांचा वापर केल्यास तुमची ध्येयपूर्ती नक्कीच होईल
   वरील लेख तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.

मी नितीन पाटील  Positive energy influencer,  Motivational speaker, author आहे. लाखो लोकांच्या जीवनात मला सकारात्मक बदल घडवून, दृढ आत्मविश्वासाने
परिणामकारक कृतीने  आणि सातत्याने यशाची उत्तुंग भरारी घेण्यास मदत  करणे हा माझा संकल्प 
आहे.
याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही उत्तुंग भरारी या समूहात सामील व्हा. उत्तुंग भरारी या समूहात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.facebook.com/groups/nitinbpatil

तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा.

किंवा
9930610710 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.

positivenitin1@gmail.com
sanrosatinp@gmail.com


या इ मेल ID वर मेल करा.


अनेक शुभेच्छा
नितीन पाटील
उत्तुंग भरारी
संस्थापक
विद्यार्थी करियर यशसारथी
Positive Energy Influencer
Student Empowerment Enthusiast





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र