विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र



  • विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र 



आपणास वर्गात, मित्रांबरोबर, समाजात वावरताना, आपले विचार मांडता  येत नाही का?
 
आपणास आपल्या क्षमतेवर शंका येते का? आपणास कोणतेही कार्य करताना भीती वाटते का?

वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे असे समजावे.


 प्रथम आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमी का असते हे पाहूया.


१. स्वतःच्या क्षमतेवर असलेली शंका

२.आपण परिपूर्ण नाही अशी मनामध्ये असलेली भावना

३. पालकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची असमर्थता


यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा, भीती निर्माण होते.


आत्मविश्वास म्हणजे काय?

आत्मविश्वास म्हणजे आपण  कसे बोलतो,  कसे वागतो, कसे विचार करतो, आपली  क्षमता आणि स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास. 


आत्मविश्वास हा विद्यार्थी जीवनात खुप महत्त्वाचा  असतो. 


आत्मविश्वास हा प्रयत्नाने आणि आपल्या विचारसरणीत, वागण्यात, बोलण्यात, सकारत्मक बदल घडवून वाढवता येऊ शकतो.


आता आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र जाणून घेऊया.


मुलमंत्र पहिला-स्वतःला स्वीकारा


 


१. आपण बदलू शकत नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या गोष्टींना स्वीकारा.


२. आपल्या अपूर्णतेचा स्वीकार करून आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टीची सुरूवात करा. 


असे केल्याने आपल्या मनावरील दडपण कमी होईल. 


 मुलमंत्र दुसरा-स्वतःवर विश्वास ठेवा



  • मला ही गोष्ट येत नाही,

  • मला हे जमेल का? 


असा नकारात्मक विचार करण्याऐवजी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, 


  • मी ही गोष्ट करू शकतो

  • मला हे नक्की जमेल


 असा विचार करून प्रयत्नांची पराकाष्ठा, कठोर परिश्रम केल्यास आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण नकारात्मक विचारांवर मात करून आपण इच्छित यश प्राप्त कराल.


मुलमंत्र तिसरा- सकारात्मक विचार करा



सकारात्मक विचार केल्याने आपला स्वतः बद्दल  विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि आपली निराशा, भिती कमी होऊन आपला आत्मविश्‍वास वाढेल.

 

  • नेहमी सकारात्मक लोकांबरोबर रहा. 

  • अडीअडचणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे याचा स्वीकार करून त्यावर आपले लक्ष केंद्रित न करता, त्या अडचणींवर कशी मात करावी याचा विचार करा. 

  • संगीत ऐका, हास्य कार्यक्रम बघा, मित्रांबरोबर चर्चा करा आणि खेळा.


मुलमंत्र चौथा-व्यायाम करा



चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे असे शारीरिक व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढून आपणास ऊर्जा प्राप्त होईल त्यामुळे आपण दिवसभर उत्साही रहाल आणि आपण चांगला अभ्यास, चांगली कामे करू शकाल.


मुलमंत्र पाचवा-सकस आहार घ्या



आपल्या रोजच्या जीवनात सकस व पौष्टिक आहार घेतल्यास आपल्या शरीराची वाढ होईल, झिज भरून निघेल, ऊर्जा निर्मिती होईल, कार्यशक्ती वाढेल आणि यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल.


मुलमंत्र सहावा-वाचन करा 


ज्ञान हा आत्मविश्वासाचा मुख्य पाया आहे. नियमितपणे अभ्यासाची पुस्तके तसेच इतर चांगली पुस्तके वाचल्याने आपले ज्ञान वाढुन आपण न भिता, मनात कोणतीही शंका न ठेवता व्यक्त व्हायला सुरुवात कराल. 


मुलमंत्र सातवा- ध्येय निश्चित करा



आपण जे काही करतो त्याने

  • आपल्याला काय मिळवायचे आहे ?

  • का मिळवायचे आहे?

  •  कुठे पोहोचायचे आहे?


 हे म्हणजे ध्येय.


आपले ध्येय निश्चित असल्यास आपण आपले सर्व लक्ष ध्येयपूर्ती कडे केंद्रित  कराल त्यामुळे आपला कल निरर्थक गोष्टींकडे कमी होऊन आपली कार्यक्षमता वाढेल.


आपल्या मधील नकारात्मकता कमी होऊन आपला आत्मविश्वास वाढेल. 


वरील दिलेल्या सात मुलंमंत्रांचा आपण आपल्या जीवनामध्ये नियमितपणे वापर केल्यास आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि आपल्याला यश प्राप्त होईल. 


आपणास  आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी अधिक माहिती हवी असल्यास आपण माझ्या उत्तुंग भरारी या खाजगी फेसबूक ग्रुप मध्ये सामील व्हा.


विद्यार्थी सबलीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे विविध लेख उत्तुंग भरारी ब्लॉग्सस्पॉट.कॉम या माध्यमातून लिहिणार आहेयाचा नक्की लाभ घ्या.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही उत्तुंग भरारी या समूहात सामील व्हा.

उत्तुंग भरारी या समूहात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.facebook.com/groups/nitinbpatil

तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा.

किंवा
9930610710 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.

positivenitin1@gmail.com
sanrosatinp@gmail.com

या  मेल ID वर मेल करा.

अनेक शुभेच्छा
नितीन पाटील
उत्तुंग भरारी
संस्थापक
विद्यार्थी करियर यशसारथी
Positive Energy Influencer
Student Empowerment Enthusiast




            

टिप्पण्या

  1. वा
    खूपच छान सर
    आत्मविश्वास वाढवण्यासाठी 7 मूलमंत्र

    उत्तर द्याहटवा
  2. आत्मविश्वास वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा ब्लॉग आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप पॉवरफुल मूलमंत्र तुम्ही सांगितले आहेत sir... सध्या याची खूप गरज आहे.
    उत्तम ब्लॉग k

    उत्तर द्याहटवा
  4. खरंच खूप गरजेचा आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे. सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान लेख आहे सर . प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यन्त हे विचार पोहचले पाहिजेत .

    उत्तर द्याहटवा
  6. aapan jo kahi upkram rabavata aahat tyane vidhyarthayan khup mota labh midanar aahech pan sarvani ya gosti aapanasath sudhha karane tithkach mahtvach ahe sarv vidhyarthya parynat he vichar pohachot

    उत्तर द्याहटवा
  7. आपल्या पुढील पिढ्यांसाठी तुमच्या या महत्त्वाच्या टिप्स खरच खूप महत्त्वाच्या राहतील.

    उत्तर द्याहटवा
  8. मुद्देसूद मार्गदर्शन. Fundamental steps well explained. Keep it w.

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय छान....जे घाबरत होते व्यक्त व्हायला ते हा लेख वाचुन नक्की व्यक्त होतील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स

ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम