विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स
विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम मार्कांनी पास व्हायची ईच्छा असते, त्याप्रमाणे ते खूप अभ्यासही करतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊनही विषय आठवत नाही. (स्मरणात राहत नाही). विषय आठवत नसल्याने, उत्तर लिहिता येत नाही. त्यामुळे कमी मार्क मिळतात किंवा नापास होण्याची नामुष्की येते. विषय स्मरणात न राहण्याची मुख्य कारणे: १. वर्गात शिकताना मनापासून लक्ष न देणे २. एकाग्रता नसणे ३. अभ्यासात रुची (Interest) नसणे ४. खुप विचार करणे प्रथमतः आपण स्मरणशक्ती म्हणजे काय हे जाणून घेऊया: आपण आपल्या रोजच्या जीवनात जे पाहतो, ऐकतो इतर विविध गोष्टी आपण करतो, त्या सर्व गोष्टी आपला मेंदू साठवुन ठेवत असतो. मेंदूने साठवुन ठेवलेल्या सर्व गोष्टी आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप अभ्यास करून सुदधा विषय आठवत (स्मरणात) राहत नसेल, चिंता करायची गरज नाही. या लेखात दिलेल्या ७ महत्त्वाच्या टिप्स तुम्ही अभ्यास करताना वापरल्यास तुमची स्मरणशक्ती नक्की ...