विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा ताण कमी करण्यासाठी ६ उत्कृष्ट उपाय
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा ताण कमी करण्यासाठी ६ उत्कृष्ट उपाय
परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो. हा ताण का येतो? ताणाची लक्षणे आणि परीक्षेचा ताण कसा कमी करावा याबाबत हा लेख खास विद्यार्थ्यांसाठी.
विद्यार्थ्यांना परिक्षेच्यावेळी ताण का येतो?
१. अभ्यासाची तयारी पुर्ण नसणे
२. पेपर कसा जाईल याची चिंता
३. ऐनवेळी केलेला अभ्यास आठवणार की नाही
४. अनपेक्षित प्रश्न येईल का याचा विचार मनात येणे
तुम्हाला ताण आला हे कसे ओळखावे?
१. पोटात गोळा येणे
२. रात्री झोप न येणे
३. छातीत धडधडणे
४. विचारांचा गोंधळ होणे
५. डोकेदुखी
विद्यार्थ्यांनो परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या लेखातील नमूद केलेले ६ उत्कृष्ट उपाय वापरा आणि तणावरहित अभ्यास करून परीक्षेत यश मिळवा.
परीक्षेचा ताण न येण्याकरिता किंवा ताण कमी करण्यासाठी शाळा आणि कॉलेज चालू झाल्यावर रोजच्या रोज अभ्यास करायला हवा., म्हणजे ऐनवेळी परीक्षेचा ताण येत नाही. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पुर्ण झाला नाही तसेच किंवा झाला ही असेल तरी बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो. याचे मुख्य कारण म्हणजे जी गोष्ट घडलेली नाही त्याचा विनाकारण विचार करणे.
उदाहरणार्थ: पेपर कसा जाईल, ऐनवेळी केलेला अभ्यास आठवला नाही तर, अनपेक्षित प्रश्न येतील का?
उपाय १.
सकारात्मक विचारसरणी ठेवा
प्रथमतः नकारात्मक विचार मनात बिलकुल आणू नये. याऐवजी सकारात्मक विचार करा. मला पेपर अगदी सोपा जाईल, सर्व प्रश्न मी पुर्ण आत्मविश्वासाने सोडवीन असा विचार करून अगदी आनंदी आणि उत्साही मनाने अभ्यास करा. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास सकारात्मक निकाल मिळेल.
उपाय २.
योग्य नियोजन करा
परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यावर त्याची नोंद करून, प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा याचे नियोजन केल्याने प्रत्येक विषयाची स्पष्टता येईल. त्यानंतर संपुर्ण दिवसाचे एक वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे अभ्यास करा. तुम्हाला कठीण वाटणाऱ्या विषयाला जास्त वेळ द्या.
उपाय ३.
शांत ठिकाण निवडा
उपाय ४.
अभ्यासादरम्यान छोटे ब्रेक्स घ्या
परीक्षेच्या काळात सर्वच विद्यार्थी जास्त वेळ अभ्यास करतात. त्यामुळे डोकेदुखी, पाठदुखी, किंवा ताण येऊ शकतो.
हे टाळण्यासाठी अभ्यासा दरम्यान छोटे ब्रेकस घ्या. यामध्ये आपण आपले आवडते गाणे ऐका, एखादा हास्याचा कार्यक्रम बघा. एखादे फळ खावे, दूध, ज्यूस प्यावा किंवा नाश्ता करावा यामुळे अधिक ऊर्जा मिळून अभ्यासात मन रमून जास्त वेळ अभ्यास कराल. घरात खूप वेळ बसल्याने कंटाळा येत असल्यास थोडा वेळ घराबाहेर मोकळ्या हवेत फिरून या. तुमचे मन प्रसन्न होईल.
उपाय ५ . घरातील सदस्यांशी बोला, चर्चा करा
अभ्यास करतेवेळी काही प्रश्न कठीण वाटत असतील किंवा अभ्यासाचा ताण येतोय असे वाटत असल्यास घरातील सदस्य, आई बाबा, आजी आजोबा भाऊ बहीण यांच्या बरोबर बोला आणि चर्चा करा. ते तुम्हाला मदत करतील आणि त्यांच्याशी चर्चा केल्याने आपले प्रश्न सुटतील तसेच आपल्या मनावरील ताणही कमी होईल.
उपाय ६.
दीर्घ श्वास घ्या, ध्यान करा
परीक्षेच्या वेळेस अभ्यास करताना ताण येत असल्यास, ३ दीर्घ श्वास व्हा आणि सोडा. १० मिनिटे ध्यान करा. त्यामुळे विचारांचा गोंधळ कमी होऊन मनावरील ताण कमी होईल.
तर विद्यार्थ्यांनो वरील ६ उत्कृष्ट उपाय करून परीक्षेच्या ताणाला पळवून लावा. आणि सकारात्मकतेने आनंदी आणि उत्साहाने अभ्यास करा आणि परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करा.
विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी ६ उत्कृष्ट उपाय हा लेख तुम्हांला कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
विद्यार्थी सबलीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे विविध लेख उत्तुंग भरारी ब्लॉग्सस्पॉट.कॉम या माध्यमातून लिहिणार आहे. याचा नक्की लाभ घ्या.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही उत्तुंग भरारी या समूहात सामील व्हा.
उत्तुंग भरारी या समूहात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/nitinbpatil
तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा.
किंवा
9930610710 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.
positivenitin1@gmail.com
sanrosatinp@gmail.com
या इ मेल ID वर मेल करा.
अनेक शुभेच्छा
नितीन पाटील
उत्तुंग भरारी
संस्थापक
विद्यार्थी करियर यशसारथी
Positive Energy Influencer
Student Empowerment Enthusiast







खूप छान नितीन सर सध्या जे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे मुलांमध्ये परीक्षे बद्दल खूप ताणतणाव आहे या ब्लॉगचा त्यांना नक्कीच उपयोग होईल
उत्तर द्याहटवाThank you kalpana tai
हटवाVery nice blog.... Amazing tips for study....very useful........Great thank you.....👏👏👍
उत्तर द्याहटवाThank you Dipti
हटवाKhup chhan explaination
उत्तर द्याहटवाफार सविस्तर आणि चांगली माहिती मिळाली..
उत्तर द्याहटवाधन्यवाद..!