१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तम मार्कांनी पास होण्यासाठी ७ उपयुक्त मुलमंत्र
१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तम मार्कांनी पास होण्यासाठी ७ उपयुक्त मुलमंत्र
१० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे शिक्षणप्रणाली मध्ये विशिष्ट महत्व आहे. या परीक्षांना सामान्यतः बोर्डाची परीक्षा असे संबोधले जाते. या परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील खूप महत्त्वाच्या आणि त्यांच्या जीवनाला नवीन कलाटणी देणाऱ्या असतात.
या परीक्षेत मिळणाऱ्या चांगल्या मार्कांवर पुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या
आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येतो व आपले उज्ज्वल भविष्य घडवता येते. त्यामुळे उत्तम मार्कांनी पास होणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते.
मुलमंत्र १.
अभ्यासाची सुरवात लवकर करा
ही दोन्ही शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी असणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच तुम्ही अभ्यासाची सुरूवात करा, त्यामुळे वर्षभर वर्गात शिकताना तुम्हाला विषय लवकर समजेल, त्यावर रोजच्या रोज अभ्यास केल्यास परीक्षा येईपर्यंत सर्व अभ्यासाची तयारी पुर्ण होईल.
मुलमंत्र २.
सर्व विषयांच्या नोट्स काढा
नोट्स मुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा वाचते, कमी वेळात अभ्यास पुर्ण होतो. आकलन शक्ती (memory), लक्ष केंद्रित होते आणि अभ्यासाची पुनरावृत्ती (revision) लवकर होते.
मुलमंत्र ३.
मागील वर्षांचे पेपर सोडवा
मुलमंत्र ४.
शिक्षक पालक अणि मित्रांची मदत घ्या
तुम्ही तुमचे वर्गशिक्षक, मित्र आणि घरातील सदस्यांची मदत घ्या. ते विषय पुर्णपणे समजून घ्या आणि रोज त्या विषयांचा स्वतः सराव करा. रोजच्या रोज सातत्याने सराव केल्यास ते कठीण विषय सोपे वाटायला लागतील आणि तुम्ही ते विषय अगदी सहजरित्या पास व्हाल.
मुलमंत्र ५.
मित्र मैत्रिणीं बरोबर अभ्यास करा
सर्जनशीलता (Creativity) वाढते, अंतरंग समजण्याची कुवत वाढते (insights), प्रत्येकाकडे विशिष्ट प्रतिभा (talent) असते त्यामुळे विविध पद्धतीने विषय
समजण्यास मदत होते.
Acronyms, Abbreviations वापरा
Acronym उदाहरणार्थ: NASA (an acronym for National Aeronautics and Space Administration)
Abbreviations उदाहरणार्थ: Mar (March)
अभ्यास करताना या पद्धतीचा वापर केल्यास स्पष्टता (clarity) मिळते, शॉर्ट मध्ये लिहिल्याने लवकर लक्षात राहून पटकन आठवते.
मुलमंत्र ७.
Flashcards वापरा
Flashcards म्हणजे कागदाचा (पातळ कार्डबोर्ड) चा छोटा तुकडा असतो, त्याच्या पुढील आणि
मागील बाजुस रिक्त जागा असते. Flashcards ने तुमचे ज्ञान (knowledge) टेस्ट करता येते.
त्यावर तुम्ही पुढील बाजुस key word or important point लिहून त्याचे उत्तर त्या flashcards च्या मागील बाजुस लिहा. Flashcards वर Text
आणि Pictures चा वापर केल्यास अभ्यासाचे आकलन उत्तमरित्या होईल.
या लेखात दिलेल्या ७ मूलमंत्रांचा तुम्ही वापर केल्यास तुम्ही १० आणि १२ वीच्या
परीक्षेत उत्तम मार्कांनी हमखास पास व्हाल.
१० वी आणि १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनेक शुभेच्छा
यशस्वी व्हा
वरील लेख तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही उत्तुंग भरारी या समूहात सामील व्हा.
उत्तुंग भरारी या समूहात सामील होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/nitinbpatil
तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा.
किंवा
9930610710 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.
positivenitin1@gmail.com
sanrosatinp@gmail.com
या इ मेल ID वर मेल करा.
अनेक शुभेच्छा
नितीन पाटील
उत्तुंग भरारी
संस्थापक
विद्यार्थी करियर यशसारथी
Positive Energy Influencer
Student Empowerment Emthusiast








Good tips
उत्तर द्याहटवाThank you manjusha tai
हटवाखूप छान मूलमंत्र आहेत, विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल
उत्तर द्याहटवाThank you sir
हटवाछान माहितीपूर्ण मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाThank you nehal tai
हटवाखुपच छान माहीती दिलेली आहे आणि खरंच येणाऱ्या भावी पिढीला या माहितीचा अत्यंत उपयोग होणार आहे आणि तुम्ही करत असलेल्या या कार्याला खरंच माझा खूप खूप सलाम 🙏🙏💐💐
उत्तर द्याहटवाThank you vidya
हटवाKhup chan 👌👌👍
उत्तर द्याहटवाSir your suggestions are good and important.
उत्तर द्याहटवाThank you sachin
हटवाखूपच छान मार्गदर्शन केलंत सर
उत्तर द्याहटवाThank you Uchita
हटवाVery Clear & Precise Blog Sir...
उत्तर द्याहटवा