कॉल सेंटर बँक मित्र

                                 कॉल सेंटर बँक मित्र 

बँक ही एक परवाना धारक वित्तीय संस्था आहे. बँक म्हटली की आर्थिक व्यवहार. बँकेचे मुख्य आर्थिक व्यवहार म्हणजे पैशांचे व्यवस्थापन, चलन विनिमय, पैश्याच्या ठेवी, कर्ज देणे होय.

आज जग फार वेगाने पुढे जात आहे. आजच्या युगात बँकेचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कामाचे वाढते स्वरूप, ग्राहकांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांशी निगडीत महत्त्वाची कामे करायला वेळ अपुरा पडतो. त्यामुळे बँक काही कामे आऊटसोर्स करतात, यात कॉल सेंटरला प्राधान्य दिले जाते.

कॉल सेंटर सेवा विभागातील एक कार्यशाली संघ आहे जे येणारे कॉल्स रिसिव्ह करते आणि ग्राहकांना फोन कॉल करते. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीत कॉल सेंटर खूप महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. कॉल सेंटर टेली मार्केटिंगद्वारे बचत खाते, करंट खाते फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग खाते, व्याज याबाबत ग्राहकांना योग्य आणि महत्त्वाची माहिती आपल्या स्टाफ मार्फत सांगते. तसेच ग्राहकांना सुस्वागतम कॉल, वाढदिवस शुभेच्छा, EMI Remind कॉल, लोन रक्कम रिकव्हरी, मिनिमम बॅलन्स अलर्ट अश्या इतर सेवाही पुरवते.

बचत खाते:

सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात लागतो आणि मग नोकरी लागल्यानंतर पगार वळता करण्यासाठी त्यांना बँकेत बचत खात्याची गरज भासते. त्याचप्रमाणे बँकेलाही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन बचत खात्यांची गरज भासते. कॉल सेंटर संभाव्य ग्राहकाला कॉल करून बचत खात्याबद्दल माहिती देऊन त्यास बँकेत खाते उघडण्यास मदत करू शकते. त्यामुळे बँकेला निश्चितच आपला फायदा होईल.

कर्ज वितरण:

सर्वसामान्य लोकांना आपल्या जीवनात घर, शिक्षण, लग्न, जमीन, कार, मुलांचे लग्न, परदेशवारी, हॉस्पिटल खर्च, व्यवसाय अश्या विविध कारणांसाठी कर्ज घ्यावे लागते. कर्ज कसे घ्यावे, त्याकरिता अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे लागतील यांची संपूर्ण माहिती कॉल सेंटर मार्फत दिली जाऊ शकते. तसेच कर्ज घेतल्यानंतर एखादा ग्राहक दर महिना EMI भरत नसेल तर कॉल सेंटरच्या टेलीकॉलद्वारे ग्राहकांना कॉल करून रिकव्हरी करता येईल.

वाढदिवस शुभेच्छा:

आजकाल प्रत्येक व्यक्ती हा मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा दिसतो. वाढदिवसाला ग्राहकाला जर बँकेतर्फे वाढदिवस शुभेच्छा दिल्यास ग्राहक निश्चितच खुश होईल, हे काम कॉल सेंटर सहजतेने करू शकते. ग्राहक खुश तर तो नेहमीच एकाच बँकेत खाते कायम ठेवून आपल्या सर्व पैशांची गुंतवणूक त्याच बँकेत करेल.

मिनिमम बॅलन्स अकाउंट:

बँकेत काही खाती ही मिनिमम बॅलन्स अकाउंटसहित खोलली जातात पण बरेच खातेदार ही गोष्ट पाळत नाहीत अश्यावेळेस कॉल सेंटर खातेदारांशी बोलून त्यांना याबाबत कल्पना देऊन मिनिमम बॅलन्स ठेवण्यास उद्युक्त करू शकेल.

कस्टमर फिडबॅक:

सर्विस सेक्टर यात मोडणारा प्रत्येक व्यवसाय ग्राहकाला उत्तमोत्तम सर्विस देण्याचा प्रयत्न करतो. पण देत असलेली ही सर्विस ग्राहकाला आवडते की नाही याकरिता ग्राहकांचा फिडबॅक मिळणे फार जरुरी असते. ग्राहकाला बँकेची सर्विस चांगली वाटते की नाही (कस्टमर फिडबॅक) याचा रिपोर्ट कॉल सेंटर घेऊ शकते. यामुळे बँकेला अजून चांगली सर्विस देता येईल आणि ग्राहकाला खुश ठेवता येईल.

कॉस्ट सेविंग:

प्रत्येक व्यवसायिक आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असतो. व्यवसायाची योग्य मार्केटिंग, नियोजन, कृती आणि सातत्य याचबरोबर रोजच्या व्यवहारात कॉस्ट सेविंग करणे हा अति महत्वाचा भाग आहे. बँकेतील व्यसत्तेमुळे सर्वच कामे करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागते त्यामुळे खर्च वाढतो पण अतिरिक्त कामे ही कॉल सेंटर ला दिल्यास बँकेची मोठ्या प्रमाणात कॉस्ट सेविंग होऊ शकेल. म्हणतात ना Money Saved is money earned. 

कर्जदारांना वेळेवर EMI भरण्यासाठी स्मरणपत्र:

संसार म्हटला की जबाबदारी, सर्वच जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येक व्यक्तीला कर्ज हे घ्यावेच लागते. कर्ज घेतल्यानंतर काही महिने EMI बरोबर भरला जातो पण काही कारणास्तव EMI वेळेवर भरला जात नाही अश्यावेळेला कॉल सेंटर अंतिम तारखेच्या आधी ग्राहकास EMI भरण्याची आठवण करून दिल्यास ग्राहक वेळेवर आपला EMI भरतील.

कर्जदारांनी वेळेवर EMI भरल्यास लेट फी चार्जेस आणि इंटरेस्ट लागण्याची संभावना कमी होईल:

ग्राहकाने कर्ज घेतल्यानंतर जर दर महिन्याला येणारा EMI वेळेवर न भरल्यास ग्राहकाला लेट फी आणि इंटरेस्ट लागतो. पण जर EMI अंतिम तारखेच्या आधी कॉल सेंटरद्वारे ग्राहकांना सूचित केल्यास ग्राहक वेळेवर EMI भरतील त्यामुळे त्यांना लेट फी आणि इंटरेस्ट लागणार नाही. 

NPA अकाउंट्स कमी होतील:

एखाद्या ग्राहकाने बँकेतुन कर्ज घेतल्यास त्या कर्जाची परतफेड ही दर महिना EMI भरून केली जाते. पण ग्राहकाने सलग ३ महिने EMI न भरल्यास त्या ग्राहकाचे अकाउंट NPA (Non performing assets) अकाउंट म्हणून गणले जाते. बँकेने जर कॉल सेंटर द्वारे ग्राहकांशी संवाद साधल्यास ग्राहक वेळेवर EMI भरतील आणि त्यामुळे NPA अकाउंट्सची संख्या कमी होईल.

रिकव्हरी ऑफिसरची गरज भासणार नाही:

ग्राहकाने वेळेवर EMI न भरल्यास ती रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी बँकेकडून रिकव्हरी ऑफिसर नेमण्यात येतात. या कामाकरिता बऱ्याच वेळेला ग्राहकाकडे जावे लागते तसेच बराच खर्चही येतो. या प्रक्रियेला लागणारा खर्च आणि वेळ हा कॉल सेंटरला काम दिल्याने बऱ्याच प्रमाणात कमी होऊन रिकव्हरी ऑफिसरची गरज भासणार नाही.

बँक कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल

बँकेतील कर्मचाऱ्यांना बँकेत बचत खाते, रिकरिंग, फिक्स्ड डिपॉझिट, करंट खाते उघडणे तसेच पैश्यांचे लेन देन अशी बरीच कामे असतात त्यामुळे सर्वच कामे करण्यास वेळ मिळत नाही. ग्राहकांकडून रिकव्हरी करणे, बँकेच्या सुविधांबाबत माहिती देणे, ग्राहकांशी दृढ व्यावसायिक तसेच पर्सनल नाते निर्माण करणे ही कामे कॉल सेंटरला दिल्यास बॅंकेचा वेळ वाचेल आणि ह्या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग ते इतर महत्त्वाच्या कामाकरिता आणि नियोजन करण्यासाठी करू शकतील म्हणूनच म्हटले आहे Time is money.

अनियमित अकाउंट धारकांना वकिलातर्फे नोटीस पाठवण्याचा खर्च वाचू शकेल:

ग्राहकाने कर्ज घेतल्यानंतर जर ग्राहकाने सलग ३ महिने EMI न भरल्यास सदर अकाउंट Non performing asset म्हणून गणले जाते. ग्राहकांकडून कर्जाचे EMI वसूल करण्यासाठी वकिलातर्फे नोटीस पाठवावी लागते. याला वकिलाची फी आणि नोटीस पाठवण्याचा खर्च येतो. ग्राहकाने कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यासाठी आणि वकील आणि नोटीस याकरिता लागणारा खर्च टाळण्यासाठी कॉल सेंटर हा एक खास मार्ग आहे.

वेळेवर रिकव्हरी झाल्यास बॅंकेचा प्रॉफिट आणि पत वाढेल

बँकेचे उत्पन्न हे ग्राहकाला दिलेल्या कर्जाच्या व्याजावर अवलंबून असते म्हणून बँक ग्राहकाला कर्ज देते पण अनेक ग्राहकांचे कर्जाचे हप्ते थकल्यास बँक बुडीत जाऊ शकते. त्याकरिता दिलेले कर्ज वेळीस रिकव्हर केल्यास बॅंकेचा प्रॉफिट वाढून बाजारपेठेत बँकेची पत वाढेल.

बँकिंग क्षेत्रात आणि रिझर्व्ह बँकेत विश्वासहर्ता वाढेल:

कॉल सेंटरद्वारे रिकव्हरी कॉल तसेच इतर महत्त्वाची कामे करून घेतल्यास वेळेवर कर्ज वसुली होईल तसेच बँकेला त्यांचे रोजचे काम करण्यास वेळ मिळाल्याने ग्राहकांना जास्त चांगली सर्विस देता येईल. योग्य कामकाज आणि कर्ज रिकव्हरी झाल्यास बँकेची, बँकिंग क्षेत्रात आणि रिझर्व्ह बँकेत विश्वासहर्ता वाढेल.

नवीन प्रॉडक्ट लाँच

बँकेला आपलं मार्केट मधील स्थान बळकट करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन प्रॉडक्ट्स लाँच करणे खूप आवश्यक असते. बँकेने जर एखादे नवीन प्रॉडक्ट लाँच करून त्याबाबतची सर्व माहिती ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी कॉल सेंटर हा उत्तम पर्याय आहे. कॉल सेन्टरद्वारे नवीन प्रॉडक्ट बाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन त्या प्रॉडक्टला उत्तम प्रतिसाद मिळेल.

अप सेलिंग आणि क्रॉस सेलिंग:

साधारणतः बँकेचे सर्वच ग्राहक बॅंकेच्या सुविधा वापरत असतात. जर ग्राहक एखादी सुविधा वापरत असेल तर त्याच्या निगडित इतर सुविधा ग्राहकाला देऊन अप आणि क्रॉस सेलिंग कॉल सेन्टरद्वारे करता येईल त्यामुळे बँकेच्या उत्पन्नात वाढ होऊन बॅंकेचा प्रॉफिट वाढेल.

चांगली रिकव्हरी झाल्यास जास्त ग्राहकांना कर्ज देता येईल:

बँकेने ग्राहकाला कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची वेळेवर रिकव्हरी कॉल सेंटर मार्फत केली जाऊ शकते. व्याजासाहित कर्ज वसुली झाल्यास बँकेचे उत्पन्न वाढून बँक जास्त ग्राहकांना कर्ज देऊ शकेल.

कॉल सेन्टरला बँकेची कामे सोपावल्यास वरील नमूद केलेले अनेक फायदे बँकेला होतील. म्हणूनच कॉल सेंटर एक बँक मित्रच आहे.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ महत्वाच्या टिप्स

ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र